नांदेड प्रतिनिधी : राजकुमार पाटील मंगनाळे -
राज्य बेसबाॅल असोशिएशन व नांदेड जिल्हा असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तिसरी राष्ट्रीय स्पर्धो दिनांक २५ ते २८ आँगस्ट २०२२ रोजी नरहर कुरूंदकर कौठा, बी. पी. एड. काॅलेज नांदेड येथे संपन्न झाली असून बी. एस. एफ. आय. सब ज्युनिअर १५ वर्षाखालील मुले व मुली यांनी नॅशनल बेसबाॅल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्रच्या संघाने मध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे
महाराष्ट्र संघाला ब्राॅझ मेडल प्राप्त झाले असून महाराष्ट्र संघाचे नेतृत्व नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूल सिडको च्या विद्यार्थिनी केले होते. महाराष्ट्राच्या संघामध्ये नालंदा शाळेतील आठ मुलींचा समावेश होता
कर्णधार नम्रता तिवारी, अर्पिता कदम, अनुष्का बेंबरकर, संजना राजूरवार, सृष्टी दुधगावकर, अवनी वंजे, आर्या कावलगावकर, नेहा वाघमारे या मुलींचा समावेश होता या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार, संचालक श्री केशव गड्डम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लता तम्मेवार, श्री श्रीकांत गड्डम, सौ. दुर्गा गड्डम, श्री सूर्यकुमार पिल्ले शाळेतील क्रिडा शिक्षक कासिम खान व निलेश डोंगरे यांनी यशस्वी मुलींचे कौतुक केले आहे.
