Header Ads Widget

महसूल प्रशासना कडून शेतकऱ्यांच्या पिकाचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळधिकारी तलाठ्या मार्फत पंचनामे चालू


नायगाव फास्ट न्यूज: मधुकर जवळे: 

नायगाव तालुक्यातील बरबडा व रुई बु परिसरात महसूल प्रशसांनाच्या मार्फत तहसीलदार गजानन शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी डी डी कळकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी परोडवाड यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे सर्व्हे करुन पंचनामे करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत असून शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करण्यासाठी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी दिरंगाई करू नये असे नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सूचना केल्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामे करण्यासाठी थेट कर्मचारी दिसत आहेत
तालुक्यातील रुई बु परिसरात अतिवृष्टीतून वाचलेल्या पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी आवश्यक ते असणारे सर्व कामे म्हणजे आंतर मशागतीचे कामे, वेगवेगळ्या फवारण्या करणे, खते टाकणे, अशी सर्व कामे शेतकरी करण्याच्या प्रयत्नात असताना अचानक रविवारी पुन्हा पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांचा अंदाज फसला असून पावसाला सुरवात झाल्याने पंचनामे करायचे अजून लांबणीवर जाणार की काय असी भीती निर्माण झाली असल्यामुळे पावसामुळे सदरच्या पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी पुर्ण पणे चिंताग्रस्त झाला असल्यामुळे महसूल प्रशासनाच्या वतीने तलाठ्या मार्फत पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात येत आहे