Header Ads Widget

विजपुरवठा करणा-या डिपी जवळील नालीत शाॅक लागून दुप्ती म्हैस जागीच ठार.तर युवक बाल बाल बचावला



नायागांव : बाळासाहेब पांडे : 

नायगाव : मांजरम गावात विजपुरवठा करणा-या डिपी जवळील नालीत शाॅक लागून दुप्ती म्हैस जागीच गतप्राण झाल्याची घटना घडली आहे.तर दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने म्हैस हकणारा युवक मात्र थोडक्यात बचावला अशी घटना महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडली असून मांजरम ता नायगाव येथील अल्प भूधारक शेतकरी बाबु माणिका गोरडवार हे सकाळी म्हैसीचे दुध काढून ती गावा लगत असलेल्या आखाड्यात बांधत होते व या ठिकाणी सदरची घटना घडली आहे 

तालुक्यातील मांजरम येथे दिनांक १९ जुलै २०२२ रोजी सकाळी नऊच्या सुमारास म्हैस डीपी शेजारी वाहणाऱ्या नालीत उतरली काही कळण्याच्या आत जबरदस्त शाॅक मुळें म्हैस जाग्यावरच गतप्राण झाली.सदरील प्रकार उपस्थित लोकांच्या लक्षात येताच म्हैसहकणा-या युवकाला सावध केले.गरीब कुटुंबाच्या प्रपंचा आधार असलेली जवळपास सत्तर हजार रूपये किंमतीची दुप्ती म्हैस जागीच ठार झाली.या संदर्भात तहसीलविज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देऊन पंचनामा केला आहे.सदरील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी  केली जात आहे.