Header Ads Widget


नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार : 

रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नरसी येथे कंटनरने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नायगाव तालुक्यातील नरसी येथे घडली असून आयचर कंटनर चालकाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पोलीस सुञाकडुन मिळालेली माहीती अशी की मालवाहतूक आयचर कंटनर क्र.आर.जे.०२ .जी.बी. ०१०७ ही कंटनर दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने देगलुर कडून नरसीकडे येत असताना नरसी -देगलुर रोडवर असलेल्या चामुंडा हाॅटेल जवळ हा अपघात झाला आहे

नरसी येथील सदरच्या हॉटेल येथे फराळ पाणी करून बाहेर रोडच्या बाजूला उभा असलेल्या मयत भुमा गणपती गायकवाड वय ५० वर्ष राहणार बेळकोणी बु.तालुका बिलोली यांना जोराची धडक दिल्याने सदरच्या तरुणांनाच्या डोक्याला  जब्बर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेत असलेल्या तरुणास नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले येथील डाॅक्टरनी जखमी भुमा गणपती गायकवाड यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले  आहे 
यात कंटनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व निष्काळजी पणामुळे मजुरांला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला मयत भुमा गणपती गायकवाड यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून बेळकोणी ता.बिलोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले रामतीर्थ पोलीस ठाण्यात सदरचा कंटेनर क्रमांक .आर.जे.०२.जी.बी.०१०७ या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शखाली फौजदार शेख लथिफ यांनी माहिती दिली व पुढील तपास सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख लतिफ हे करीत आहेत