Header Ads Widget

शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी २५ हाजर रुपये देण्यात यावे म्हणून राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ तहसीलदाराची भेट घेणार


.      माधव पवार
नायगाव तालुक्यातील गेल्या पाच ते सहा दिवसा पासून या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या पावसात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरीराव भोसीकर  व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे,यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नायगाव तालुका अध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या नेतृत्वाखाली माधवराव पाटील बेंद्रिकर राष्ट्रवादी काँग्रेस यूवक तालुका अध्यक्ष यांनी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ भेट शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे पंचनामा हेक्टरी पंचवीस हजार रुपयाची मदत द्यावी यासाठी शिष्टमंडळ भेट घेणार आहे
तालुक्यातील मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले त्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यासाठी यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ १२ दिनांक २०२२ रोजी भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष विश्वानाथ बडुरे यांनी माहिती दिली असून शेतकऱ्यांचे पिके संततधार पडल्यामुळे शेतातील पिका बरोबर माती ही वाहून गेली आता शेतात उरले केवळ दगड, अशी गत पावसांनी झाली असल्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करून तात्काळ मदत दयावी असे सदरील शेतकऱ्यांतुन बोलल्या जास्त असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही नायगावच्या तहसीलदाराची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे