नायगाव फास्ट न्यूज : माधव पवार : मधुकर जवळे :
नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे वडगाव येथील एका मातेसह आपल्या दोन मुलाचा विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना दिनांक ८ जुलै २०२२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असून सदरील घटनेची माहिती नायागांव पोलीसाला कळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम वडगावात रवाना होऊन घटनेची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला आणि सदरील मयत मातेसह दोन चिमुकल्या बाळाचे प्रेत पोलिसांनी ताब्यात घेऊन नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदन करण्यासाठी आणल्याचे सांगण्यात आले आहे
नायगाव तालुक्यातील मौजे केदार वडगाव येथील सदरची घटना हे अतिशय दुर्दैवी असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात असून सदरील घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पोलीस टीमला घटनास्थळी रवाना केले आहे
तालुक्यातील आलू वडगाव येथील रहिवासी असलेल्या मयत विवाहित महिलेचे माहेर उमरी तालुक्यातील मौजे कारला येथील रहिवासी असलेले आनंदा हैबती गोनेकर यांची ती मयत विवाहिता मुलगी असल्याचे सांगण्यात आले सदरच्या मयत महिलेचे नाव रुपाली चंद्रकांत गोरे वय २९ वर्ष मुलगा बालाजी चंद्रकांत गोरे वय ७ वर्ष मुलगा लहान मुलगा अभिजित चंद्रकांत गोरे वय ५ वर्ष हे सर्व राहणार केदार वडगाव ही सदरची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक बी जी काळे यांनी नायगाव फास्ट न्यूजला माहिती दिली असून तक्रार मात्र अध्याप कोणत्याही नातेवाईवाकानी व्रत प्रकाशित होई पर्यंत ठाण्यात आली नसली तरी ठाण्याचे फौजदार आनंदराव वाघमारे यांनी सदरील घटनेची चौकशी जारी ठेवली आहे
