नायगाव तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या घुंगराळा ते बळेगाव रुई येथे आकारा हाजार असलेला विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे मुसळधार पावसात सदरच्या लाईन मेन कर्मचाऱ्यांनी पावसात कुडकुडत सदर चा विद्युत पुरवठा सुरळीत केला असल्यामुळे पाच ते सहा गावे अंधारात असलेली प्रकाशात आणले विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता यांच्या आदेशानुसार कृष्णूर युनिटचे सहायक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलेल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
कृष्णूर युनिट अंतर्गत काम करणारे व अधिकाऱ्याचा आदेश पाळत मुसळधार पावसात असे वडजे, दुसेवार ,पांचाळ , बोईनवाड, शेख आदी कर्मचारी काम करताना दिसत आहेत
तालुक्यातील कृष्णूर युनिट अंतर्गत असलेल्या काही गावात संततधार पावसामुळे अनेक गावाचा वीजपुरवठा पावसात खांबे उधळून जाऊन वीज पुरवठा खंडित झाला होता परंतु विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी मुसळधार पावसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी व थांबे उभे करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी जमिनीतून पाणी खड्डा खोदत असताना वर येत असल्यामुळे दुसरा पर्याय शोधून डायरेक दुसऱ्या खांबावर लाईट जोडत आहेत आणि गावालाविद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत दिसून येत असून ग्रामीण भागात दररोज पाऊस पडत असल्याने लाईन म्हणाला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत असल्याचे चित्र सरळ सरळ दिसून येत आहे
