Header Ads Widget

पूर्णेतील थुना नदीला आला पूर,पूर्णा झिरोफाटा मार्ग बंद संततधार पाउसामुळे जनजीवन विस्ळीत पूर्णा झिरोफाटा रस्त्यावर असलेल्या माटेगाव येथील पुला वरून पाणी वहात असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद


पूर्णा तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसा पासून सत्तादार पाउस सुरू असल्याने थुना नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे तालुक्यातील बऱ्याच गावाचा संपर्क तुटल्याची माहिती हाती आली आहे आज दि 13 जुलै रोजी पूर्णा झिरोफाटा महामार्ग वरील माटेगाव येथील थुना नदी वरील पूलाच्या लेवल पाणी आल्याने या मार्गावरील वहातुक बंद करण्यात आली आहे.तालुक्यातील सहा महसूल मंडळा मध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे
पूर्णा,कातनेश्वर,कावलगाव,चुडावा,महसूल मंडळात 98 .7 मि मी ताडकळस महसूल मंडळात 87.8मि मी,तर लिमला 87 .7मि मी पाण्याची नोंद करण्यात आली आहे.सूरु असलेल्या सत्तादार पाऊसा मुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वहात आहे.बऱ्याच शेतात पाणी साचल्याने उभी पिके धोक्यात आली आहे गोदावरी,पूर्णा नदीची ही पातळीत वाढ दिसत आहे.या सुरु असलेल्या पाऊसा मुळे जनजीवन विस्ळीत झाले आहे
तालुक्यातील नद्यांची पाणी पातळीत वाढं होत असल्याने नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे थुना नदीने धोक्याची  पातळी ओलांडली असल्याने पूर्णा झिरोफाटा मार्ग सकाळी 10 30 वाजल्यापासून बंद करण्यात आला असून त्या ठिकाणी माटेगावचे तलाठी,पोलीस पाटील,व काही पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आहे तालुक्यातील फुकटगाव,माहेर,ऐरडेश्वर,आहेरवाडी,कौडगाव,सदलापूर,आदी गावाचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे