Header Ads Widget

सरसमच्या शेतकऱ्यानी कर्ज बाजारीसह सततच्या नापिकीला कंटाळून आंब्याच्या झाडा गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली हिमायतनगर तालुक्यातील घटना


हिमायतनगर :-चांदराव वानखेडे

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील एका युवा शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज बाजारी पणाला कंटाळून आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली केली आहे या घटनेमुळे सरसम गावावर शोककळा पसरली असून रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात असे मयत शेतकऱ्याचं नाव असून या बाबत सविस्तर वृत्त असे कि नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गत वर्षी अतिवृष्टीने हैराण करून सोडले असे असताना देखील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी साठी भरपुर मशागत केली मात्र ऐन पिकाच्या मोसमात वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले त्यामुळे कोरड वाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे अक्षरशः कंबरडेच मोडले असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे 
---------------------------------------------------------------
हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्या फौजदार जाधव मॅडम
ह्या पुढील तपास करीत असल्याची माहिती पोहेका एच आर चोले यांनी नायागांव फास्ट न्यूजला दिली आहे
---------------------------------------------------------------
तालुक्यातील सरसम येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर यांच्या आदेशानुसार फौजदार जाधव मॅडम यांनी त्यांच्या पोलीस टीमच्या सहकार्यानी सदर घटनेची पाहणी करुन पंचनामा केला आहे सदरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 
---------------------------------------------------------------
याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजार होऊन पंचनामा केला. मयत युवा शेतकऱ्याच्या प्रेताचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले. शेतकऱ्याच्या कुटुंबाना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे
-----------------------------------------------------------------
असाच काहीसा अनुभव हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु येथील शेतकऱ्यास आला आहे. यामुळे बैंकेचे कर्ज कसे फेडायचे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने युवा शेतकरी रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात वय ३२ वर्ष यां अविवाहित शेतकऱ्याने जीवन यात्रा संपविली आहे
-----------------------------------------------------
ऐन खरीप पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना युवा शेतकऱ्याने हे टोकाचे पूल उचलले असल्याने सर्वस्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत युवा शेतकऱ्याच्या नवे ४ एकर शेती आहे, त्यांनी भारतीय स्टेट बैन्केकडून ९० हजार कर्ज घेतले होते. तसेच कृषी विभागाकडून शेतीसाठी ट्रॅक्टर उचलले होते. मात्र अनेक वर्षपासून होत अतिवृष्टी व नापिकीमुळे शेती नुकसानित अली होती. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता मागील
काळात शेतीसाठी बैन्केकडून घेतलेले कर्जाची परतफेड झाली नसल्याने यंदा कृषी लोन मिळण्याची आशा धूसर झाली होती. त्यामुळे यंदा पेरणी कशी करावी या विचारात शेतकरी सतत चिंतामग्न राहत होता. याच विवंचनेतून रुपेश उर्फ धम्मपाल सखाराम थोरात यांनी आपले शेत सर्वे क्रमांक २१४/२ मधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे