.
नायगाव प्रतिनिधी -:- बाळासाहेब पांडे
ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय नायगाव येथील विद्यार्थ्यांनी शेळगाव छत्री येथे लोकसहभागातून ग्राम सर्वेक्षण उपक्रम राबविला त्यामध्ये सर्व विद्यार्थिनींनी ग्राम सर्वेक्षण करताना व सामाजिक नकाशा काढताना गावातील जेष्ठ नागरिक आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा सहभाग व मार्गदर्शन घेऊन त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वतःचे गाव कसे दिसते हे प्रत्यक्षात नकाशात उतरविले आहें
नकाशात गावातील रस्ते सामाजिक सरचना घरे व वास्तव्याचा प्रकार शाळा ग्रामपंचायत मंदिर सभाग्रह अंगणवाडी नदी इत्यादी गोष्टींचा समावेश करण्यात आला सदरील उपक्रम राबवताना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गावाचा संपूर्ण अभ्यास करून गावातील लोकांच्या समस्या व त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेऊन गावातील उपस्थित असलेल्या साधन संपत्तीचा अभ्यास केला.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनिता सूर्यवंशी दिपाली ससाने नेहा शेख समृद्धी तांबागडे गायत्री तेलंग तेजस्विनी राठोड दिपाली मारवाडी स्नेहल पामलवाड वैशाली तपघाले पद्मजा साखरे जयश्री पाशपु, करुणा येडेली शारदा राखोंडे या सर्व कृषी कन्यांनी अतिशय परिश्रम घेतले व गावचे सरपंच श्री जळबा शंकर वाघमारे व उपस्थित गावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच हा कार्यक्रम एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्रा.श्री रवींद्र पाटील चव्हाण संचालक श्री रमेश लवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश नादरे कार्यक्रम समन्वयक प्रा शंकर नागणीकर कार्यक्रम अधिकारी दुर्गा चाटसे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
