Header Ads Widget

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या करुन पावसा अभावी हैराण झालेल्या शेतकऱ्याची चिंता थांबली !!


         माधव पवार
नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील बऱ्याच पैकी शेतकऱ्यानी महागाडीचे बी बियाणे खरीदी करुन शेतात पेरणी केली परंतु मध्यतंर पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी गट पेरण्या करुन पाऊल पडत नसल्यामुळे हैराण झाला होता परंतु दिनांक २७ जून २०२२ रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यात वाढत चाललेली चिंता थोडक्यात थांबलीv असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात असून शेतकऱ्यानी गेल्या सहा ते सात दिवसा पासून पेरणी करण्याच्या घाईत होते आणि पेरण्या करुन पावसाची प्रतीक्षा करत बसल्याचे दिसून आले होते सदरचा पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे आकाशाकडचे डोळे आता शेताकडे फिरले आहे
तालुक्यातील शेतकऱ्यावर गेल्या दोन वर्षा पासून कोराना  महामारीच्या नावाखाली शेतकरी अगोदरच परेशान झाला त्यात पेरणी करण्यासाठी सावकारी कर्जदारा कडून व्याजी बी बिया भरणासाठी टक्केवारीने पैसे घेऊन खत बियाणे खरीदी करुन पेरण्या शेतकऱ्यानी केल्या होत्या परंतु पाऊस अचानक दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता सोमवारी संध्यकाळी पाच सहा वाजण्याच्या दरम्यान पाऊल पडल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत पेरण्या केलेल्या शेताकडे पाहात असताना दिसून आले असले पेरणी पूरक अध्याप पाऊल झाला नसल्याचे व्रत असून सदरचा पडलेला पाऊल पडल्याने पेरणी केलेल्या बियासाठी पोषक ठरला असल्याचे काही शेतकऱ्यानी सांगितले आहें