Header Ads Widget

आपत्कालीन काळात शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल होत नसल्याने जनतेतून संताप वेळ प्रसंगी बरबडा,कुंटूर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतिदक्षता रुग्णवहिका सज्ज ठेवा •• जनतेची मागणी -


नायगाव -विश्वाभंर वन्ने / माधव पवार 
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्ग असो की दुसरा कोणता ही मार्ग असो आरोग्य विभागा कडून रुग्णाच्या सेवेसाठी शासनाने ठेवण्यात आलेल्या शासकीय रुग्णवाहिका आपत्कालीन काळात फोन केल्यावर सुद्धा घटनास्थळी तत्काळ दाखल होत नसल्यामुळे जनतेसह जनसामान्य माणसातून संताप व्यक्त केला जात असून कोणती ही घटना कोणाला सांगून किंवा विचारुन होत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या संबंधित दवाखान्यातील रुग्ण वाहिका बसून ठेवण्या ऐवजी आपत्कालीन काळात पेशंटला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णवाहिका पाठवून देण्यासाठी आरोग्य विभागाने आदेश द्यावे अशी मागणी जनतेतून बोलल्या जात आहे
नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण वाहिके वरच अवलंबून राहण्या पेक्षा नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर अधून मधून मोठ मोठे अपघात होताना दिसून येत असून आपत्कालीन काळात प्राथमिक आरोग्य केंद्र बरबडा,प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर येथील असलेल्या शासकीय रुग्ण वाहीकेचा सुद्धा बसून ठेवण्यापेक्षा वापरात घेण्याची गरज असून एकीकडे अपघात होत असतात दुसरीकडे नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिका पेशंट घेऊन नांदेड शासकीय दवाखान्यात नांदेडला जातात परंतु १०८ ला फोन केल्याच्या नंतर रुग्ण वाहीका उपलब्ध राहत नसते त्यावेळेस ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका दवाखान्यात बसून ठेवण्या पेक्षा रुग्ण वाहीका आपत्कालीन काळात सेवेसाठी सज्ज ठेवण्यात यावे रुग्ण घेऊन जाण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यानी रुग्ण वाहिलेला घटनास्थळी पाठवून दयावे अशी मागणी जनतेतून होत आहे 
राज्य महा मार्गांवर एखादी अपघाताची घटना घडली की सुज्ञान नागरिक प्रथम शासकीय रुग्ण वाहीकेची मदत मागतत परंतु त्यावेळेस सदरची रुग्ण वाहीका पेशेंट घेऊन गेलेली असते ते गाडीची प्रतिक्षा लोकांना करावी लागते आणि अपघातील रुग्ण रस्त्यावर तडपडत असतात अनेक वेळा दिसून आले असून अशा संकट काळी बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन आरोग्य रुग्ण वाहीका असल्यामुळे बसून ठेवल्या जातात परंतु रुग्णाच्या सेवेसाठी वापरल्या जात नाहीत आरोग्य विभागाने जनतेची दखल घेऊन रुग्णवाहिका संकट काळात घटना स्थळी पाठवून द्यावेत अशी मागणी जोर धरीत असली तरी आपत्कालीन काळात शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ दाखल होत नसल्याने जनतेतून संताप वेळ प्रसंगी बरबडा, कुंटूर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अतिदक्षता रुग्णवहिका सज्ज ठेवा •• जनतेची मागणी होत आहे