मराठी पत्रकार परिषद, मुंबई च्या वतीने नायगांव मराठी पत्रकार संघाला देण्यात आलेल्या सन्मानाच्या स्व वसंतराव काणे आदर्श पुरस्काराने तालुक्यातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात व तालुक्यातील वैभवात मोठी भर पडल्याने त्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन प्राप्त राष्ट्रवादी युवा नेते तथा नृसीह सुत गिरणीचे व्हाईस चेअरमन भास्कर पा भिलवंडे केले नरसी येथील भास्कर पाटील भिलवंडे यांनी त्यांच्या फ्रॉम हाऊसच्या बुधवारी ११ मे रोजी नायगांव मराठी पत्रकारसंघास राज्य स्तरीय पुरस्कार विजेते असलेल्या ६० पत्रकारांना बोलवून त्यांचा सन्मान व गौरव सोहळा मोठ्या थाटात आयोजन करून त्यांचा उत्सव वाढविल्याने जेष्ट पत्रकारांनी त्यांचा सत्कारचे कौतुक केले आहे
या प्रसंगी नायगाव मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,तालुका प्रभारी लक्ष्मण भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे, माजी तालुकाध्यक्ष गंगाधर भिलवंडे, मनोहर तेलंग,सय्यद जाफर,कार्याध्यक्ष प्रकाश हणमंते,नरसी सर्कल अध्यक्ष गोंविंद नरसीकर,कुंटुर अनिल कांबळे, उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,मनोहर मोरे,रामराव ढगे,सहसचिव रामप्रसाद चन्नावार,शिवाजी पन्नासे,सह असंख्य पत्रकारांची उपस्थिती होती
या दरम्यान सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अशोक जाधव यांची निवड झाल्याबद्दल भास्कर भिलवंडे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.तर सर्व पत्रकारांचा सन्मान सोहळा घडवून आणल्याबद्दल तालुका तालुका पत्रकार संघाच्या वतीने भास्कर भिलवंडे यांचा भव्यदिव्य सत्कार केला यावेळी सूर्यकांत सोनखेडकर, प्रभाकर लखपत्रेवार, लक्ष्मण भवरे ,प्रकाश हानमंते यांची भाषणे झाली.या सत्कार सोहळ्या साठी पत्रकार श्याम गायकवाड व मारोती सूर्यवंशी यांच्या मधुर गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते
कार्यक्रमाचे संचलन गंगाधर गंगासागरे यानी केले तर आभार संयोजकानी मानले आहे
श्याम चौंडे, यावेळी शिवराज पा बामणीकर,माधव कोरे,पांडुरंग बागडे, जळबा सूर्यवंशी,रमाकांत सुर्यवंशी, बालाजी शिंदे, शेषराव कंधारे,प्रकाश महीफळे,मारोती बारदेवाड,बालाजी हणमंते,सय्यद अजीम, साहेबराव दसाडे,शेषराव बेलकर,किरण वाघमारे,यशवंत मोरे,शेख सत्तार, हणमंत वाडेकर,आनंदा डाकोरे, सहदेव तुरटवार,विरद्र डोगरे,नीळकंठ जाधव,दिंगबार जुंबाडे आदींची उपस्थिती होती.
राज्य स्तरीय पुरस्कार अन् भिलवंडे यांनी केलेला सन्मान कौतुकास्पद माजी जिल्हाध्यक्ष - सूर्यकांत सोनखेडकर
मराठी पत्रकार परिषदेचा मानाचा राज्य स्तरीय तालुका आदर्श पुरस्कार ६ मे रोजी गंगाखेड येथे नायगाव मराठी पत्रकारसंघाला मिळाल्याने निश्चित सर्व जेष्ट पत्रकारांच्या जबाबदारी वाढली असून राष्ट्रवादीचे भास्कर पा भिलवंडे यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना बोलवून जो सन्मान केला.तो अविस्मरणीय व कौतुकास्पद असल्याचे मत मराठी पत्रकारसंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांनी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले आहे
