Header Ads Widget

नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णासाठी जास्तीच्या सुविधा द्यावे मागणी !!!


          माधव पवार 
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्रार्थमिक आरोग्य केंद्रात सुविधेचा दुष्काळ असल्यामुळे शासनाने सदरच्या रुग्णालयात बाहेर गावावून येणाऱ्या रुग्णासाठी व गरोदर मातेसाठी दर्जेदार सुविधा देण्यात यावेत अशी मागणी या विभागातील जनतेनी केली असून शासन जनतेचा शासकीय रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमी प्रयत्न करत असले तरी स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यां कडून वाटेल तेवढ्या सुविधा मिळत नसल्यामुळे सदर रुग्णाला खाजगी दवाखान्याचा मार्ग शोधावा लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे 
ग्रामीण भागात शासकीय दवाखान्यापेक्षा खाजगी दवाखान्यातच सोयी सुविधा मिळत असल्यामुळे आर्थिक चंनचणीची बाजू असली तरी उपचार योग्य  मिळत असल्यामुळे रुग्णाची धाव सारी शासकीय ऐवजी खाजगी कडे लागताना दिसून येत असून गेल्या दोन वर्षा पासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतील शासनाने मंजूरी देऊन सुद्धा बऱ्याच ठिकाणचे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झाले नसल्यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णाला अनेक संकटाचा सामना करावा लागत असून सदरच्या दवाखान्यात सोनुग्राफीची व्यवस्था करण्यात आली नाही स्वच्छ पाण्याची व्यवस्था वाटेल तेवढी सुविधा मिळत नसल्यामुळे शासनाने सदरच्या दवाखाण्याचा दर्जा वाढविणे गरजेचे आहे