एस.बी.आय.बँक शाखा रामतीर्थ,नायगाव अंतर्गत शेती विषयक देण्यात येणाऱ्या कर्ज प्रकरणात दलाला मार्फत दलाली खाल्या शिवाय कामे होने अवघड बनले असून सिएसपी सेंटर चालवणारे व बँकेत हाताखाली मजुरीने काम करणारे कर्मचारीच दलाली करत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला असून या प्रकरणाची सर्वनिहाय कसून चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी विभागीय व्यवस्थापक साहेब, भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटनिस विलास पाटील धुपेकर यांनी निवेदना द्वारे केली आहे
स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा रामतिर्थ तालुका बिलोली नायगाव आदी शाखेत लिड कृषि शैली अंतर्गत शेतकऱ्याना विहित स्वरुपात देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी पिक या मोठ्या शेतकऱ्याना दिले जाते ते दलालांना हाताशी धरून त्यांच्या चेल्या चपाटया मार्फत बँकने खाजगी तत्वावर जी दोन व्यक्ती बँक्रेत नियुक्तों केलेल्या लोकांच्या मार्फत असंख्य शेतकऱ्यांना १० टक्के कमिशन मागुन काम करीत असल्याचे निर्देशनास आले आहे
तरी काही शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली. मी सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रवादी जिल्हा चिटनिस असून सदर बँकमध्ये शेतीविषयक व पिक कर्जाची सविस्तर चौकशी करण्यात यावी आणि किती शेतकऱ्याना कोणत्या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. याची यादि मला देण्यात यावी व पिक कर्ज किती लोकांना मंजुर करण्यात आले व किती नामजूर झाले याची कारणे देऊन याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
बँकेत काम करण्यासाठी खाजगी व्यक्ती नेमलेल्या आहेत व जनतेच्या सुविधाने कामे व्हावीत म्हणून सिएसपी सेंटर उघडले आहेत त्याचे कर्मचारी सरास दलाली घेऊन बँक आधिकारी यांना हाताशी धरून कामे करीत असून याची चौकशी करून त्वरित कार्यवाही करावी नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा विलास पाटील धुप्पेकर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस, नांदेड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चौकशी करून कार्यवाही करणार विभागीय अधिकारी येरावार या विषयी बँकेचे विभागीय अधिकारी शँकर येरावार साहेब यांना भ्रमणध्वनी वरून चौकशी केली असता असा प्रकार होणे म्हणजे शेतकर्या सह सर्वांच्या साठी घातक असून त्वरित चौकशी करून दोषींवर कार्यवाही करू.पण शेतकऱ्यांना असे दलाल सतावत असतील थेट बँकेच्या विभागीय शाखेशी संपर्क करून न्याय मिळवून घ्यावा अथवा तक्रार द्यावी आम्ही योग्य कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले आहे.
