नायगाव तालुक्यासह बिलोली तालुक्यातील दुगाव जवळील पुलाचे काम गुत्तेदारासह संबंधित विभागाच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या अनेक महिन्या पासून रेंगाळले असल्यामुळे कुंटूर, सालेगाव, डोंगरगाव मार्गावर असलेल्या पुलाचे खोदकाम करण्यात आले परंतु ते पूर्ण केले नसल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत असून या सदरच्या पुलाच्या कामाकडे शासनासह गुत्तेदारानी पावसाळ्या पूर्वी सदरचे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी या विभागतील नागरिकानी केली असली तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदार दुगाव येथील पुलाचे काम करण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील डोंगरगाव, व सालेगाव कुंटूर असले तरी याच मार्गांवर असलेले दुगाव हे बिलोली तालुक्यातील असल्याने याच गावाजवळ गुत्तेदाराने पुलाचे काम करीत असून काही शेतकऱ्यांनी असे सांगितले की गेल्या पाच महिन्या पासून याच परिस्थितीत काम असल्याचे सांगण्यात आले असले तरी काही शेतकऱ्यांच्या वांद्यात रेंगाळत असल्याचे सांगण्यात आले हे फक्त निमित्त असू शकते शासकीय यंत्रणा कामावर राबविण्या ऐवजी प्रशासन गुत्तेदारा मार्फत काम केले जात असल्यामुळे कोणत्याच गुत्तेदाराने काम वेळेस करत नसल्यामुळे अनेक अडचणी येताना दिसून येत आहे
नायगाव तालुक्यात ही गुत्तेदाराने कोणतेच काम पुलाचे पूर्ण केले अध्याप पूर्ण केले नसून त्याच बरोबर बिलोली तालुक्यातील ही सदरच्या रस्त्यावर होत असलेले पुलाचे काम रेंगाळत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असो की जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी असो यांचे कसल्याच प्रकारचे लक्ष नसल्यामुळे अशीच गत सर्वत्र निर्माण झाली असल्याचे दिसून येत असले तरी कुंटूर,डोंगरगाव सालेगाव रस्त्यावर असलेल्या दुगाव जवळ गुत्तेदारासह संबंधित विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे पुलाचे अनेक महिन्या पासून रेंगाळले असल्यामुळे सदरच्या पुलाचे काम पावसाळ्या पूर्वी करण्यात यावे अशी मागणी या भागातील जनतेची जोर धरीत आहे
