Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील वीट भट्ट्या बंद करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन ! बिलोलीचे उपविभागिय अधिकारी सचिन गिरी यांच्या तोंडी आश्वासना नंतर धरणे मागे ••


 नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
नायगाव तालुक्यातील राहेर, इज्जतगाव, मेळगाव, बरबडा येथील गोदावरी पत्राच्या काठावर चालत असलेल्या व त्यापासून काही अंतरावर असलेल्या परवाना धारक वीटभट्ट्या  व अनधिकृत वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे गोदावरी पात्राचे सौंदर्याचे विद्रूप होत असल्याने सदरच्या वीटभट्ट्या तात्काळ बंद करण्यात यावे म्हणून नायगावच्या तहसील कार्यालया समोर दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी पासून एका नामांकित पत्रकारांसह दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी लगातार चार दिवस धरणे आंदोलन केले परंतु नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी धरणे आंदोलन कर्त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून अनेक भट्टीला लागणारी माती गोदावरी काठावरून मोठ्या प्रमाणात उत्खलन केल्यामुळे गोदावरी पात्र धोक्यात आल्याचे दिसून येत असल्यामुळे सदरच्या वीटभट्ट्या तात्काळ बंद करा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलना तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी सचिन व तहसीलदार गजानन शिंदे आणि मंडळधिकारी विजय जाधव यांनी प्रयत्न केले आहे 
तालुक्यातील राहेर, बरबडा, इज्जतगाव मेळगाव, रुई बु व इतर गावात वीटभट्या चालू असल्यामुळे त्या वीट भट्या बंद करण्यात याव्या म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले परंतु नायगावच्या तहसीलदारानी दखल घेतली नसल्याचे कार्यात्याचे म्हणे असून सदरची दखल बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी नायगाव तहसीलला अचानक भेट दिल्याच्या नंतर त्यांना धरणे आंदोलन करत असलेले कार्यकर्ते दिसून आले त्यांनी कार्यकर्त्याची विचारपूस करत सदरचे होत असलेले धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न चालू ठेवले होते सचिन गिरी यांच्या तोंडी आश्वासना नंतर धरणे आंदोलन कार्यकर्ते मागे घेतले असून तहसील कार्यालय नायगाव समोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलन कर्त्यांची बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दखल घेऊन १५ दिवसाच्या आत संबंधित वीटभट्टी धारकांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे धरणे आंदोलन करते तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गंगाराम पवार, गणपत रेड्डी, सामाजिक कार्यकर्ता तथा  पत्रकार माधव बैलकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याचा मान राखीत सदरचे होत असलेले धरणे आंदोलन मागे घेतले आहे
तालुक्यात वीटभटी धारकाचा धुमाळ माजला असल्यामुळे सर्वच वीटभट्या बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते परंतु धरणे आंदोलन कर्त्यांनी प्रशासनास सहकार्य केल्यामुळे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनाच्या विश्वासाला तडा बसू नये असे धरणे आंदोलन कर्त्यांचे यांचे म्हणणे असून या संदर्भात नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांना येत्या पंधरा दिवसात वीटभटांच्या चौकशा करून वीटभट्टी धारकांवर कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकाऱ्यानी दिल्या असून दिलेल्या सूचनेचे पालन तहसीलदार  गजानन शिंदे यांनी केले तर वीट भट्टी धारकांवर योग्य ती कारवाई होईल असे ही धरणे आंदोलन कर्ते यांचे म्हणणे असून तालुक्यातील राहेर, मेळगाव, इज्जतगाव बरबडा परिसरातील गोदावरी काठाची सोने मोलाच्या मातीचे उत्खनन करून वीटभट्टी धारकांनी मोठ मोठाले कारखाने थाटले असल्याने सदरच्या वीटभट्ट्या तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी, पत्रकार माधव बैलवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पवार यांनी नायगावच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते