Header Ads Widget

बिलोलीचे उपविभागीय अधिकरी सचिन गिरी यांच्यासह नायगावच्या तहसीलदार गजानन शिंदे यांनी सावरखेडच्या झेंडयाचा वाद ग्रामपंचायतच्या सहकार्याने महात्मा गांधी तंटामुक्त समितीत तोडगा काढावा !


          माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याचा वाद सुवर्ण आणि दलित समाजात अनेक वर्षा पासून चालू असल्यामुळे या सदरच्या वादाकडे प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे अध्याप कोणत्या ही अधिकाऱ्यानी तोडका काढला नसल्यामुळे अनेक वेळा सुवर्ण व दलितांवर झेंडयाच्या वादातुन कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरच्या झेंडयाचा वाद मिटवीण्यासाठी उपविभागीय अधिकारी बिलोलीचे सचिन गिरी यांच्यासह नायागांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सावरखेडच्या ग्रामपंचायतला सोबत घेऊन झेंड्याच्या कारणाहुन होत असलेला वाद झट की फट मिटवून दिले पाहिजे असे गावकऱ्यातुन बोलल्या जात आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे सावरखेड येथे झेंडयाच्या बांधकामा वरून झालेल्या हाणामारीत गावच्या उपसरपंचासह दहा जनावर ॲट्रॉसिटी कुंटूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आणि त्यातील सर्वच आरोपी म्हणजे आरोपी गावचे उपसरपंच नारायण तुकाराम पाटील ढगे, सुरेश नारायण पाटील ढगे,संतोष नारायण पाटील ढगे, अमृता नारायण पाटील ढगे, मारोती नारायण ढगे, प्रभाकर गोविंद ढगे, बालाजी गवणाजी ढगे, त्रिंबक बालाजी ढगे, पांडुरंग बालाजी ढगे, दिलीप बालाजी ढगे,यांच्यावर कुंटूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील फिर्यादी प्रताप जळबा कदम यांच्या फिर्यादी वरून आरोपीला कुंटूर पोलिसांनी अटक ही केली असून दुसऱ्या गुन्ह्यातील   आरोपी फरार असल्या सांगण्यात येते 
कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मुझे सावरखेड येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झेंड्याच्या जागेचा वाद सुवर्ण आणि दलित  वर्गात धूपत असल्यामुळे सदरचा कायमचा वाद व तिडा मिटविण्यासाठी बिलोली चे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी आणि नायगाव चे तहसीलदार गजानंद शिंदे यांनी सावरखेड येथील ग्रामपंचायतच्या सहकार्याने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे आणि गावकऱ्यांना सदरच्या वादातून मुक्त करण्यासाठी ग्रामसेवक यांच्यासोबत गावकऱ्या बरोबर शांतता कमिटीची बैठक लावून त्या बैठकीत सदरचा तिडा कायमस्वरूपी बंद करावा असे ही जनतेतून बोलल्या जात आहे
दुसऱ्या गुन्ह्यातील सावरखेड येथील आरोपी राजेंद्र कदम,रावसाहेब कदम, गणेश कदम, साहेबराव कदम, मिलिंद कदम, व इतर पाच जण यांच्यावर अमृता नारायण पाटील ढगे  यांच्या फिर्यादी वरून गुन्हा कुंटूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सदरचे आरोपी फरार असल्याचे समजते आणि ॲट्रॉसिटीतील आरोपी अटक करून सदर प्रकरणाचा तपास धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत आहेत