बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाट तात्काळ बंद करण्यात यावा म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदाराना दिले निवेदन -घाटाची ईटीएस मशिनद्वारे मोजणी करा ••
माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथील खाजगी रेती घाटाची रेती ठेकेदाराना शासनाने सदरच्या रेती घाटाची परवानगी देण्यात आलेली होती परंतु रेती उत्खननाची परवानगी देण्यात आलेल्या गटातील वास्तव चित्र पाहिले तर रेतीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रेती ठेकेदार महसुल प्रशासनाशी संगनमत करून रेती उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली असल्याची चर्चा असली सदरच्या निवेदन कर्त्यांचे म्हणे असून परवानगी दिली एका गटाची मात्र मात्र दुसऱ्या गटात केल्या जात असल्यामुळे गंजगाव,मांजरा, नदीतील वास्तव चित्र पाहण्यासाठी मिळत असून मांजरा नदी पाञातुन रेतीचा ठेकेदार दैनंदिन चार ते पाच जेसिबीच्या साह्याने मोठया प्रमाणात उत्खनन करत असल्यामुळे सदरच्या गंजगाव येथील रेती घाट तात्काळ बंद करण्यात यावा यासाठी बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदाराना निवेदन देण्यात आले आहे
बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथील ज्या रेती घाटात लाल रेतीचे मोठया प्रमाणात उत्खलन होताना दिसते त्या रेती घाटाची ईटीएस मशिनद्वारे तात्काळ मोजणी करून सदरचा रेती घाट बंद करण्याच्या मागणीसाठी गंजगाव येथील रहिवासी असलेले निवेदन कर्ते माधवराव घाटे व नरसिंग ओनरवाड यांनी बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदाराला दिनांक १९ एप्रिल २०२२ रोजी निवेदन देऊन कळविले असून यांची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनाने घाट बंद करावा अशी मागणी होत असून सदरची रेती ---
महाराष्ट्रातच नव्हे तर राज्या बाहेर म्हणजे कर्नाटक तेंलगणा आदी राज्यात जाताना दिसून येते -
तरी या रेती घाटातुन मोठ्या प्रमाणात वाळुचे उत्खलन होत असल्यामुळे सदरची रेती ही अतिशय सोन्याच्या भावात विक्री होत असल्यामुळे सदरची रेती असल्यामुळे
तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाट क्रमांक ८१,८२,८३ गटातील मांजरा नदी पाञात अंदाजे दहा फुटापेक्षा ही खड्डे पडल्याचे लक्षात आल्याच्या नंतर गंजगावच्या दोघा निवेदन कर्त्यांनी शासनाची लाखो रुपये संपत्ती नष्ट होत असल्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यासह तहसीलदाराना घाट बंद करण्यासाठी निवेदन दिले आहे
शासनाच्या संपतीची मोठया प्रमाणात एका बाजूने लूट होताना सुद्धा स्थानिक महसूल प्रशासन का डोळेझाक करीत करतोय असा प्रश्न चर्चेला जातं असला तरी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांची एकी कडे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून चर्चा होताना ऐकावयांस मिळत असून दुसरी कडे गंजगाव रेती घाटातून शासकीय मालमतेची लूट होताना दिसून येत असताना सदरचे अधिकारी कोणतेच ऍक्शन घेत नसल्यामुळे सदरील प्रकरणात तालुका महसुल प्रशासनातील नायब तहसिलदार तलाटी मंडळधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज भासत असली तरी शासकीय मालमतेची चांगलीच विल्हेवाट लागत असल्यामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणामुळे रेती ठेकेदाराला रेतीचे उत्खनन करण्यासाठी एका गटाची परवानगी तर प्रशासनाच्या डोळ्यात रेती ठेक्केदाराची धूळ म्हण्याची वेळ आली आहे
.
