Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील इकळीमाळ येथे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची तहसीलदार गजानन शिंदे यांनी घेतली भेट ••


 नायगाव फास्ट न्यूज / बाळु इकळीकर

नायागांव तालुक्यातील मौजे माळइकळी येथे एका गरीब कुटूंबातील शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला कर्ज बाजारीपणाला कंटाळुन इकळीमाळ येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियाची नायागांवचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केले असून सदर आत्महत्या ग्रस्त शेतकरी मयत राजेश मारोतराव जोगदंड  वय ३८ वर्ष यांनी दिनांक ३० मार्च २०२२ रोजी आत्महत्या केली असल्यामुळे प्रशासनाच्या मार्फत तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी तहसीलदार शिंदे माळइकळी जाऊन आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे माळइकळी येथे सदरच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी जास्तीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून नायगाव तालुक्यात अनेक वर्षाखाली शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या तहसीलदाराच्या मार्फत पाठपुरावा केल्यामुळे लवकर मदत ही मिळाली होती त्याच पद्धतीने नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी राजेश मारोतराव जोगदंड यांच्या कुटूंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून  आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाच्या भेटी दरम्यान तालुका कृषी अधिकारी गोसावी, मंड़ळ अधिकारी शेख , व तलाठी काळे यांनी भेट घेतली आहे
माळइकळी येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी राजेश मारोतराव जोगदंड यांच्या कुटूंबियाना नायगावच्या तहसीलदारानी शासनाच्या वतीने आर्थिक मदती बरोबर  शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही तहसिलदार गजानन शिंदे यांनी कुटुंबाला दिली असून एखादा घरातल्या कुटुंब प्रमुखावर कर्ज बाजरी व सततच्या नापिकींमुळे आत्महत्या करण्याची वेळ येते त्या कुटुंबाला शासना कडून आर्थिक मदत केल्या असतें त्यानुसार नायगाव तहसीलदार गजानन शिंदे यांनी वरिष्ठ पातळीवर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची इकळीमाळ येथे तहसीलदार शिंदे यांनी घेतली भेट घेतली आहे