Header Ads Widget

जुक्टा संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. किशन गायकवाड तर सचिव पदी प्रा.नारायण गाढवे यांची निवड

शंकरनगर : हणमंत रामतीर्थकर -  

शंकरनगर येथे दिनांक २५ ऑगस्ट रोजी बिलोली तालुका जुनिअर कॉलेज शिक्षक संघटनेची ( जुक्टा ) नूतन कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्वानुमते श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेज शंकरनगर येथील प्रा.डॉ.किशन गायकवाड यांची अध्यक्षपदी तर हु.पानसरे ज्युनिअर कॉलेज अर्जापूर येथील प्रा.नारायण गाढवे यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
  
ही निवड अतिशय खेळमेळीच्या वातावरणात तालुक्यातील सर्व जूनियर कॉलेज प्राध्यापकांनी यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून प्रा.जीवन शिंदे तर कोषाध्यक्ष प्रा.कच्छवे,महिला कार्यकारणी सदस्या म्हणून प्रा.सौ.पिंपळगावकर मॅडम,कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा.शंकर पवार,प्रा.चिद्रावार, प्रा.साईनाथ पाटील,प्रा.शिवाजी पाटील, प्रा.देवणे,प्रा.कवडेकर,यांची निवड झाली.   

सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साईबाबा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री धनंजय शेळके सर तर कार्यकारणी निवडीचे निरीक्षक म्हणून माजी अध्यक्ष प्रा.नागनाथ खेळगे प्रा.चौधरी प्रा.संजय हंबीर बैठकीस उपस्थित होते.

आयोजक प्रा.डॉ.गणेश राठोड,प्रा.राजेश गाडेगांवकर हे उपस्थित होते.याप्रसंगी निवड झालेल्या सर्व नूतन कार्यकारिणीचे प्राचार्य धनंजय शेळके यांनी स्वागत केले.सदरील निअव्द झालेल्या कार्यकारणीचे अभिनंदन जिल्ह्याचे लोकप्रिय नेते मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर,संस्थेच्या सचिव मा.डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर मा.बाळासाहेब पाटील खतगावकर,प्राचार्य संजय पाटील शेळगावकर,प्राचार्य डॉ.बी.एस.पिंपळे मु.अ.डी.डी.वडजे यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी पाटील प्रा.राजेश गाडेगावकर यांनी केले