Header Ads Widget

नायगाव येथील केवळबाई मिरेवाड वाङमय पुरस्कारांची केली घोषणा




बाळासाहेब पांडे : नायगाव विशेष प्रतिनिधी : 

 येथील मातोश्री कै. सौ. केवळाबाई मिरेवाड पुरस्कार जाहीर झाले झाले असून, यावर्षी सुनील देसाई, डॉ. सुरेश सावंत, सुनील जाधव, उषा हिंगोणेकर, एकनाथ आव्हाड, डॉ. महेश खरात, वृषाली खैरनार, रवि भिसे, आनंद पुपलवाड, पंडित पाटील, व्यंकट आनेराये यांना पुरस्काराची घोषणा केली आहे नायगाव बाजार येथील मातोश्री के. सौ. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.

या पूर्वी जाहीर झालेले पुरस्कार असे कादंबरी विभाग कोल्हापूर येथील सुनील देसाई यांच्या सप्तपर्व आणि औरंगाबाद येथील डॉ. महेश खरात यांच्या 'बुगट' कादंबरी (विभागून) कथा विभाग पालघर येथील सुनील : जाधव यांची मी आहे

आणि धुळे येथील तृषाली खैरनार यांचा दुष्टचक्र कथासंग्रह (विभागून) कविता विभाग जळगाव येथील उषा हिंगोणेकर यांच्या 'धगधगते तळघर आणि पुणे येथील आहे. रवि भिसे यांच्या 'माझा निषेध झाला पाहिजे हे काव्यसंग्रह (विभागून), बालसाहित्य विभाग ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या गुगलबाबा आणि मुंबई येथील बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद हे पुस्तक स्थानिक पुरस्कार या विभाग आनंद पुपलवाड यांच्या 'अभंग कुणब्याचे आणि इतर कविता तसेच पंडितपाटील यांच्या 'गोड गाणी या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 
  
त्याच प्रमाणे नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रांना देण्यात येणारा पुरस्कार यावर्षी इसाप' प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व्यंकट आनेराये यांच्या आम्हाला सौजन्याचा शाप या पुस्तकाला देण्यात येणार प्रत्येक विभागासाठी दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि स्थानिक पुरस्कारासाठी ५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 अशोक कौतिक कोळी, पांडुरंग पुठ्ठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षण समितीने या पुरस्काराची निवड केली आहे. १६ जुलै रोजी संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.