Header Ads Widget

नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कडे एकविस हाजाराचे उत्पन्न मिळावे म्हणून अपंग व वृद्ध व्यक्तीनी दिले निवेदन


नायगाव -:- मधुकर जवळे -:-

नायगाव तालुक्यातील एकूण ८९ गावाचा संबंध  नायगाव तालुक्याच्या तहसीलदाराशी दैनंदिन व्यवहारात येत असतो अशा गावा अंतर्गत दहा ते बारा लोक अपंग आणि जवळ पाच पंचवीस ते तीस लोक वय वृद्ध असल्यामुळे कर्तव्याच्या चौकटीत असलेले गजानन शिंदे यांच्याकडे विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन दिले जातात त्यांचा निपटारा करण्यासाठी तहसीलदार सक्षम असल्यामुळे जनसामान्य माणसाला कसल्याच प्रकारची अडचण भासू नये लक्ष देत असल्याचे दिसत असून अशा कर्तव्य दक्ष तहसीलदाराकडे एकवीस हाजार रुपयाचे उत्पन्नाचे प्रमाण पत्र मिळण्यात यावे म्हणून अपंग व वृद्ध
व्यक्तीनी नुकतेच निवेदन दिले आहे 
तालुक्यातील अनेक अपंग व वृद्ध नागरिक शासनाच्या योजने पासून वंचित असल्यामुळे नायगावच्या तहसीलदाराना लोकांनी दिलेल्या निवेदनाचा तोडगा काढण्यासाठी प्रकष्ठा करावेत असे ही अपंग व वृद्ध आणि जनसामान्य  माणसातून बोलल्या जात असून एकविस हाजाराचे उत्पन्न मिळावेत म्हणून दिव्याग क्रांती संघटनेच्या यांनी तहसीलदार यांना निवेदन देण्यात  आले असून अचानक अपंग व वृद्ध व्यक्तींना त्यांचे मिळणारे मानधन बंद होत असल्याने सदरच्या लोकांना बंद पडलेले शासकीय मानंधन चालू करण्यासाठी नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रयत्न करतील असी अपेक्षा जनतेसह अपंग व्यक्ती बरोबर वृद्ध व्यक्तींनी केली आहे