Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25000 रुपये देण्याची राष्ट्रवादी ची मागणी


.    किरण हानमंते 
बरबडा :- नायगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना 25000रू. हेक्टरी नुकसानभरपाई  द्यावी. या मागणीचे निवेदन नायगाव चे तहसीलदार गजानन शिंदे यांना देण्यात आले. यावेळी सदरील निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नायगाव तालुकाध्यक्ष केरबा रावते, विलास ढगे, परबत ढगे आदी उपस्थित होते.

पाच दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्या नायगाव तालुका राष्ट्रवादी ची मागणी आहे. गेल्या 5 दिवसापासून नायगाव तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी पिके खरडून गेली, वाचली ती जास्तीच्या पाण्याने कोमेजून चालली, बऱ्याच घरांच्या भिंती या पाण्याने पडले आहेत. पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी.अशी मागणी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आली आहे.