Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना अरविंद महाराज सोनखेडकर यांनी कलावंताच्या विविध मागण्यासाठी दिले निवेदन -


नायगाव फास्ट न्यूज/ माधव पवार 
------------------------
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी असलेले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प अरविंद महाराज सोनखेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांना राज्यातील तमाम कलावंताचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून विविध मागण्याचे निवेदन नांदेड येथील विश्रामग्रह येथे भेट घेऊन दिले  आहे एखादा कीर्तनकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची भेट घेऊन चर्चा करतात आणि विविध मागण्याचे निवेदन देऊन कलावंताना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात तर नक्कीच कलावंता प्रश्न मार्गी लागणार आहे 
लोहा तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी असलेले व राज्यात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रभोधन करत असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराने महाराष्ट्र सांस्कृतिक राष्ट्रवादी सेलचे मराठवाडा संपर्क प्रमुख अरविंदजी महाराज मोरे सोनखेडकर यांनी राज्यातील छोटया मोठया कलाकाराच्या विविध मागण्याच्या संदर्भात निवेदन देत दिले आहेत अरविंद महाराज सोनखेडकर यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे  होय असे ठिकाणी सांगणाऱ्या महाराजानी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी राज्याच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना विश्रामगृह नांदेड येथे त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा महाराष्ट्र सांस्कृतिक राष्ट्रवादी सेलचे मराठवाडा संपर्क प्रमुख अरविंदजी महाराज मोरे सोनखेडकर यांनी केली व महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ही यावेळी उपस्थित होते एक लोहा तालुक्यातील सोनखेड येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध कीर्तनकार व वारकरी संप्रदायातील व्यक्तमहत्व म्हणून सोनखेडकार यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे