Header Ads Widget

भारतीय रिझर्व बँकेचा कसल्याच प्रकारचा आदेश नसताना सुद्धा ग्रामीण भागात दहा रुपयाची पिवळे नाणे घेण्यास दुकानदारासह ग्राहकांचा स्पष्ट नकार दहा रुपयाची पिवळी नाणे बंद की चालू ? जनतेचा प्रश्न ••



          माधव पवार
भारतीय रिझर्व बँकेचा कसल्याच प्रकरचा आदेश नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही वर्षाखाली दहा रुपयाचे पिवळे नाणे चालनात होती परंतु नोट बंदीच्या काळात दहा रुपयाचे नाणे चालनात सर्रास होते कांही दिवसा नंतर दहा रुपयाची पिवळे नाणे चलनातुन बंद झाल्याची अफ़वा पसरली असल्यामुळे दहा रुपयाची नाणे दुकानदारासह ग्राहक घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला असला तरी राज्य महामंडळाच्या बसेस मध्ये कंडक्टर प्रवाशा कडुन दहा घेत होते परंतु दुकानदार व ग्राहक दहा रुपयाची नाणे घेण्यासाठी नकार देत असल्यामुळे नागरिक ही नाणे एकमेकां कडून घेण्यासाठी धजावत नसल्यामुळे दहा रुपयाची नाणे चलनातून बाद झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असून सदरचा गलथान कारभार भारतीय रिझर्व बँकेचा आहे की काय असा प्रश्न जनतेला पडला आहे 
जिल्ह्यासह खेड्यापाड्यात दहा रुपयाची नाणे आज ही दुकानदार व ग्रहक घेण्यास नकार देत असल्यामुळे असाच एक प्रकार एका हॉटेल मध्ये वाटसरू नावाच्या व्यक्तीने चहा पाणी घेण्यासाठी हॉटेल मध्ये गेला चहा पाणी झाल्याच्या नंतर हॉटेल चालकास बिल देण्यासाठी ग्राहकानी १०० रुपयाची नोट दिली हॉटेल मालकाने दहा रुपयाच्या पिवळ्या नाण्यासह इतर पैसे जमा करून ग्राहकाला देत असताना यातील दहा रुपयाचे पिवळे नाणे पाहून सदरच्या ग्राहकाने हॉटेल चालकास दहा रुपयाचे नाणे बंद झाले म्हणून वापस केल्यामुळे सदरचे दहा रुपयाचे नाणे शासनाने बंद केले की काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित होताना दिसून येत असून नागरिका मध्ये सुद्धा कमालीचा संभ्रम निर्माण झाला असल्याचे दिसून येत असल्यामुळे दहा रुपयाचे नाणे स्थानिक परिसरात सर्वत्र घेण्यास नकार मिळत असल्यामुळे नाणे बंद की चालू हे रिझर्व बँकेने स्पष्ट केले पाहिजे असे जनसामान्य नागरिकातुन बोलल्या जात आहे 
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दहा रुपयाची नाणे भागात चालनात असल्याचे सांगण्यात येते मात्र नांदेड जिल्ह्याच्या सोळा तालुक्यातील व खेड्यापाड्यात दहा रुपयाची नाणी कोणी स्वीकारण्यास करण्यास तयार नसून हे नाणे बंद झाल्याचे कोणते ही भारतीय आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आदेश दिले नसल्याचे सदरच्या म्हणे असले तरी ग्रामीण भागात दहा रुपयाचे नाणे का घेतले जात नाहीत असा प्रश्न जनतेला भेडसावत असल्यामुळे शासनाने भारतीय रिझर्व बँकेने दहा रुपयाचे नाणे नांदेड जिल्ह्यात चालनात आणले पाहिजे असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात असून सध्याच्या परिस्थितीत ही सदरचे ग्रामीण भागात बंद असल्याचे वास्तव चित्र असल्यामुळे दहा रुपयाची नाणे आज ही अनेकाच्या घरात पडुन असताना दिसून येत अशा भारतीय चालनाच्या राजमुद्रेचा हवामान नाही असा प्रश्न उपस्थित होत असून याला जबाबदार कोण ? जनता की भारतीय रिझर्व असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे