बरबडा ते वजीरगाव आणि कोकलेगावच्या रेंगाळलेल्या पुलाचे काम कधी होणार ? सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभारात घुंगराळा ते बळेगाव रस्त्याचा प्रश्न गंभीर अधिकारी मात्र झोपेतच !
नायगाव तालुक्यातील कुंटूर ते कोकलेगाव मार्गे नायगाव रस्त्यावर असलेल्या ओढ्यातील पुल गेल्या अनेक वर्षा पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या बेजबाबदार पणामुळे पुलाचे काम रेंगाळले असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणाचा त्रास या भागातील जनतेला ३६५ दिवस त्रास होत असल्यामुळे सदरच्या जनतेतून संताप व्यक्त केला जात असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे नायगावचे अधिकारी झोपेतच का ? असा प्रश्न जनतेला पडला असताना देखील गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काम अधून मधून काम चालू करतात आणि बिले उचलून घेऊन गुत्तेदार वर्षाचे वर्षे गायब होताना दिसून येत असताना या विभागतील पुढारी मूग गिळून का बसले असा प्रश्न जनतेला पडला असला तरी सदरच्या अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधीची वचक नसल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील बरबडा ते वजीरगाव पुलाची सुद्धा अशा पद्धतीचीच अवस्था झाल्याचे दिसून येत असून हा पुल सुद्धा सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे गुत्तेदार व या विभागाचे अधिकारी पुल बांधकाम करण्यासाठी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळे भर पावसाळ्यात बरबडा गावाच्या शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी जीव धोक्यात ठेवून पोटाला पेट्या बांधून घेऊन पोहोत शेतकडेकडे पावसाळ्यात जावे लागते तरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी गुत्तेदारास काम करण्यासाठी काही बोलू शकत नाही असे जनतेतून बोलल्या आहे
जनता वाऱ्यावर पुढारी जिल्ह्यावर विकासाची वाट लागल्यामुळे रस्ते झाले बेवारस अधिकारी पुढाऱ्याचे काही ऐकेनात ? कारण बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागते सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव आणि पुलाचे बांधकाम करणारे गुत्तेदार काम करण्यासाठी धजावत नाहीत व वजीरगाव ते बरबडा पुल बांधकाम करण्यासाठी तात्पुरते यंत्रणा उभी केली मात्र काम अद्याप चालू करण्यातआल्याचे दिसून येत नाही वास्तव चित्र असल्यामुळे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घुंगराळा ते बळेगाव रुई बुद्रुक मार्गावरील रस्ता हा अगोदर जिल्हा परिषद बांधकाम विभाकडे होता परंतु या रस्त्यासाठी खोकला गेला पडासा आला म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्यामुळे कोणत्याच विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघात कुठे ही जाऊन रस्ते शोधून पाहावे घुंगराळा ते बळेगाव रुई बुद्रुक रस्त्या सारखा
ग्रामीण भागात दाखवा असे सदरील जनतेतून बोलल्या जात आहे - नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडून गेलेले आमदार तर जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्याना नाही रस्त्याची चिंता नाही विकासाची चिंता - रस्ता सापडणार नसल्याचे जनसामान्य माणसातून बोलल्या जाते सदरचा रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडे बजेट नाही का ? अधिकारी जाणून बुजून करीत नाहीत का असा ही प्रश्न जनतेतून चर्चिला जात असून खरे तर कुंटूर ते कोकलेगाव पुलाचे बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळले तर घुंगराळा रुई हा सदरचा रस्ता सुद्धा अनेक वर्षा पासून गेला आहे
खरे तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला तेव्हा पासून रस्त्याची वाट लागली आहे

