उपवन संरक्षण अधिकारी नांदेड यांच्यासह वन परिक्षेत्र अधिकारी देगलूर यांच्या ढिसाळ नियोजनामुळे तीन तालुक्यात वृक्षांची तोड दिवसा ढवळ्या लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कधी कारवाई होणार ? ••
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना भविष्यातील काही वर्षात वृक्ष तोडी मुळे महाराष्ट्राचे वाळवंट होईल असे एका भाषणात बोलून दाखवले होते त्या पद्धतीनेच नांदेडचे उपवन संरक्षण अधिकारी यांच्यासह देगलूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नायगाव देगलूर बिलोली तालुक्यात वृक्षांची दररोज मोठ्या प्रमाणात तोड होत असताना सुद्धा सदरचे अधिकारी वृक्ष तोडीकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात लाकडांची वाहतूक करीत असताना सुद्धा कोणताच वनविभागाचा अधिकारी लाकडाची तस्करी करणाऱ्या लाकूड वाहतूक दारावर वाहनावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे जनतेतुन संताप व्यक्त केला जात आहे
नायगाव बिलोली देगालूर तालुक्यातील निसर्ग प्रेमी जनतेने वृक्षतोड बंद करण्यात यावे म्हणून अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन देऊन सुद्धा निवेदन कर्त्यांची दखल न घेता दिवसा ढवळ्या वृक्ष तोडीसाठी परवानगी दिली की काय असा प्रश्न जनतेतून चर्चिला जातो असून या गंभीर बाबीकडे वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांच्या डोळे झाक पणामुळे कोणत्याच वाहनावर या विभागतील अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून सदरचा गोरख धंदा हा लाकूड ठेकेदारा कडून अधिकार्यांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे तीन तालुक्यात वृक्षांची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लागली असल्यामुळे अनेक मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असल्याने सदरच्या तालुक्याला वाळवंटाचे स्वरूप येत असल्याचे दिसून येत आहे
महाराष्ट्र शासन एका बाजूने दरवर्षी लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड करत असते आणि दुसऱ्या बाजूने प्रशासनच लाकडांची कत्तल करण्यासाठी लाकूड ठेकेदाराला परवानगी देते हा तर प्रशासनाचा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा नवा फंडा असल्याचे ही सरळ सरळ सदरच्या कारभारातुन दिसून येत असल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात "आंधळ दळत" कुत्र पीठ खातय" अशी गत निर्माण झाली असली तरी आंधळ्याची वरात बहिर्याच्या घरात म्हणण्याची वेळ आता जनसामान्य माणसावर आली असून या देगलूर बिलोली नायगाव तालुक्यात होत असलेली वृक्षांची तोड उपवन संरक्षण अधिकारी नांदेड यांनी लक्ष देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तात्काळ वृक्ष तोडीवर बंदी घालण्यासाठी सूचना कराव्यात असे ही सदरील जनतेतुन बोलल्या जात आहे
